प्रभुकंज मध्ये आज सकाळी आलो.येण्याआधी श्री.वैद्य( शुक्रतारा कार्यक्रमाचे इथले सुत्रधार) यांनी प्रभुसृष्टीची माहिती दिली होती. इथे येउन पाहिल्यावर मात्र कोकणचे खरे रुप व सौंदर्य अनुभवले. सुंदर परिसर,अप्रतिम झाडे व उत्तम व्यवस्था तर होतीच पण मनापासुन केलेले अगत्यही होते. उत्तम कोकणी जेवण (माशांसकट) आणि कोकणातल्या भाज्या अप्रतिम होत्या. पुन्हा-पुन्हा येण्यासारखी वास्तु आहे.
Beautiful place and great natural beauty. Good service and hospitality. We will like to visit again and again.
प्रभुसृष्टीला हॉटेल किंवा रिसॉर्ट म्हणण्यापेक्षा हे एक असं ठिकाण आहे जिथे मुलांना आजोळ आणि मला गावच्या घराची आठवण झाली.
प्रभुसृष्टी म्हणजे देवाची सृष्टी ! सृष्टीसौंदर्य पाहुन मन हरवुन जाते. हिरवीगार झाडी मनाला शांत करुन जाते. असे वाटते जणु काही स्वर्गात पाउल ठेवले आहे. कधी न ऐकायला मिळेल असे मधुर गीत पक्षांच्या मुखातुन ऐकायला मिळते. दिवसभर पक्षांचे सुंदर आवाज,पावसाचे संगीत..रात्री मात्र थोडासा गोंगाट असायचा..कोणाचा ??? "बेडकांचा व रातकिड्यांचा". आणि इथल्या सर्व माणसांबद्दल तर काय लिहावे ? फारच प्रेमळ व आपुलकीने वागणारी माणसं असल्यामुळे अगदी घरच्यासारखं सुरक्षित व आरामदायक वाटलं.
श्री. प्रभु यांस, सादर प्रणाम ! कोकणच्या मातीचे सोने करुन परशुरामाच्या या भुमिचे ऋण आपण उदारहस्ते फेडले आहे त्याबद्दल मन:पुर्वक अभिनंदन !
प्रिय पुरुषोत्तम प्रभु आणि विनायक सामंत, आम्ही सर्वजण परदेशातुन आलो. कल्पनाच नव्हती की येथे आल्यावर आम्हाला अमेरिका-इंग्लंड सारखी सोय मिळेल. तुम्ही मनावर घेतलं तर खरच कोकणचा(सिंधुदुर्गचा) कॅलिफोर्निया कराल. आमच्या शुभेच्छा !
Dear Prabhu,Congratulations ! You have created a beautiful place on earth. It is a great service to nature loving tourists. Keep it up !